हत्येचा हेतू सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे सबळ पुरावे आवश्यक, आरोपीला हायकोर्टाकडून जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मित्राची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली आहे. हत्येचा हेतू सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे सबळ पुरावे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने अर्जदाराचा जामीन मंजूर केला आहे.

सांगवी पोलिसांनी 8 ऑक्टोबर 2024 रोजी हत्येच्या घटने प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला होता. आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी वादातून आपल्याच एका मित्राची हत्या केल्याचा आरोप फिर्यादी पक्षाने केला होता. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 103(1), 238 आणि 3(5) अंतर्गत अर्जदार सोमदत्त दुबे व इतरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. जामिनासाठी आरोपीने अॅड. विवेक आरोटे व अॅड. अक्षय डिंगळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.