काबुलमध्ये आत्मघातकी हल्ल्यात 18 जणांचा मृत्यू, 57 जण जखमी

अफगाणिस्तानची राजधानी काबुल मध्ये शनिवारी एक भीषण आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात शाळकरी विद्यार्थ्यांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 57 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार काबुलच्या दश्त ए बारची भागात एका शैक्षणिक केंद्राबाहेर एक आत्मघातकी स्फोट झाला. एक दहशतवादी या संस्थेत शिरण्याचा प्रयत्न करत होता. पण संस्थेच्या बाहेरच स्फोट झाला. या स्फोटात विद्यार्थ्यांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 57 जण जखमी झाले आहेत. त्यात मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

अजून कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. तालिबाननेही या हल्ला केल्याचा नकार दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या