हे करून पहा – अचानक मान दुखल्यास…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Home Remedies for Neck Pain Relief Ice Pack, Hot Compress, and Posture Correction Tips

बऱ्याचदा अचानक मान दुखायला सुरुवात होते. मान नेमकी कशामुळे दुखते हेही कळत नाही. जर तुमच्या बाबतीत असं काही झालं तर सर्वात आधी ज्या ठिकाणी मानेला सूज आहे. त्या ठिकाणी सूज कमी करण्यासाठी बर्फाचा पॅक सुती कपडय़ात गुंडाळून मानेवर 20 मिनिटे ठेवा. त्यानंतर गरम पाण्याचा शेक द्या.

मानेला जास्त ताण देणाऱया हालचाली टाळाव्यात. बसताना किंवा झोपताना तुमची मान आणि पाठ सरळ राहील याची काळजी घ्या. तणाव कमी करणे आणि नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. मान जास्त दुखत असेल तर डॉक्टरांकडे जा.