बिस्किटांवरील कर कमी करण्यासाठी जीएसटी परिषदेत दाद मागणार, मुनगंटीवार यांची ग्वाही

832

देशावरील आर्थिक मंदीचे सावट व जीएसटीमुळे आर्थिक नुकसानीमुळे पारले बिस्कीट कंपनीतील दहा हजार कर्मचाऱयांना घरी बसण्याची वेळ आली आहे. पण पारले कंपनीला मदतीचा हात देण्यासाठी जीएसटी मंत्री परिषदेत छोटय़ा किमतीच्या बिस्किटावरील टॅक्स कमी करण्याची मागणी करणार आहोत असे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

देशात बिस्किटापासून साधारण 35 हजार कोटी रुपये जीएसटी प्राप्त होतो. त्यामुळे जीएसटीच्या अगोदर असणारा टॅक्स जीएसटीमध्ये का कमी केला जातोय, असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र छोटय़ा बिस्किटांवर टॅक्स कमी करावा अशीच महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. यासंदर्भात जीएसटी परिषदेला आम्ही पत्र लिहून विनंती करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

केवळ हिंदुस्थानच नव्हे तर जगातील सर्व देशांसमोर मंदीची समस्या उभी आहे. जगाचा विकास दर पाहिला तर सरासरी 2.2 टक्के आहे. जपान .5 टक्के, आपला विकास दर चायना, अमेरिकेपेक्षा जास्त आहे. मंदी पाहता आपला जो विकास दर आहे तो वाढविण्याबाबत चिंतन व्हायला हवे, असे ते म्हणाले. संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील नवनिर्वाचित शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे, मनीषा कायंदे, संदीपान भुमरे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या