ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीन चित्रपटसृष्टीत विशेष योगदानाबद्दल देण्यात येणारे पुरस्कार जाहीर केले आहेत. अभिनेते शिवाजी साटम यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पुरस्कारांची एक्सवर पोस्ट शेअर पुरस्कारांची माहिती दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2023’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना ‘स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2023’ प्रदान करण्यात येणार आहे. चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2023, लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना आणि स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2023, जेष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन. चंद्रा यांना जाहीर केला आहे.

या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.!! राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य व उदंड यश द्यावे या शुभेच्छाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.