उबेर चालकाकडून तरुणीचे लैंगिक शोषण, केली मसाजची मागणी

940

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे मंगळवारी रात्री उशीरा उबेर टॅक्सीने घरी परतणाऱ्या तरुणीवर चालकाने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिच्याकडे मसाजची मागणी केली. या चालकाला न्यायालयाने 4.3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. वेंकेट सूरी असे त्याचे नाव आहे.

पीडित तरुणीचे नाव स्टीफनी कॉरबेट आहे. शु्क्रवारी खटल्यावरील सुनावणीत उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने सूरीला दोषी ठरवले व दंड ठोठावला.

स्टीफनी तिच्या दोन मित्रांसोबत पार्टीला गेली होती. पार्टी संपल्याानंतर रात्री उशीरा ती मित्रांसोबत उबेर टॅक्सीने घराकडे निघाली होती. मित्रांची घरे वाटेतच असल्याने ते मध्येच उतरले. त्यानंतर टॅकसीमध्ये स्टीफनी एकटी होती. याचा गैरफायदा घेत चालकाने टॅक्सी थांबवली. त्यानंतर त्याने स्टीफनीवर लैंगिक अत्याचार केला. नंतर त्याने तिला टॅक्सीतून उतरायला सांगत मसाजची मागणी केली. पण स्टीफनीने तिथून पळ काढला. नंतर पोलिसात तिने तक्रार दाखल केली. दरम्यान चालक सूरी हा उबेरसाठी चार वर्षांपासून चालकाचे काम करत असून त्याचे वर्तनही चांगले असल्याचे कंपनीचे म्हणणे होते. पण या घटनेनंतर त्याला कंपनीने कामावरून काढून टाकले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या