निसर्ग चक्रीवादळाचा कोपरगाव तालुक्याला तडाखा, साखर कारखान्याची चिमणी कोसळली

1491

निसर्ग चक्रीवादळाने नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याला  तडाखा बसला आहे. तालुक्यातील एका साखर कारखान्याची सव्वाशे फुटाची चिमणी कोसळली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

तालुक्यात जोरदार वारे सुरू झाल्याने संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कर्मवीर काळे कारखान्याच्या झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रकल्पाची 125  फुट उंचीची चिमणी हवेच्या तडाख्याने  कोसळली.  यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.  नाशिक येथे चक्रीवादळाचा जोर  वाढल्यानंतर त्याचे लोण  पन्नास ते साठ किलोमीटर हवाई अंतरावर असलेल्या कोपरगाव तालुक्यात पोहोचले.  ज्यावेळी चिमणी कोसळली त्यावेळी  या वादळाची गती साधारण   60 ते 70 किलोमीटर वेगाने  दक्षिणेकडून उत्तरेकडे होती .

तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या  आसवनी  विभागाच्या चिमणीला तडाखा बसल्याने ती कोसळली. दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम पुण्याच्या एका कंपनीने केले असून तीच कंपनीच  व्यवस्थापनही  बघत असल्याचे कळते.  बॉयलर बंद होते , सुदैवाने घटना पाच वाजेच्या आसपास घडली  अन्यथा  मोठा अनर्थ घडला, असता  कारण साडेपाच वाजेच्या   सुमारास कर्मचारी  कारखान्यातून बाहेर पडतात  चिमणी कोसळल्यानंतर   काही वेळाने हवेचा व  पावसाचा वेग वाढला.   कोपरगाव तालुक्यात व संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी (३जून) रोजी  सकाळपासूनच ढगाळ वातावरण व जोरदार हवा सुरू होती.  दुपारनंतर हवेने चांगलाच जोर धरलेला होता जोडीला बारीकसा पाऊसही होता परंतु सायंकाळी पाच वाजेच्या नंतर जोरदार हवेबरोबर पावसाच्या चांगल्या सरी कोसळू लागल्या होत्या खबरदारी म्हणून दुपारपासूनच संपूर्ण शहर व तालुक्यातील वीज पूर्णतः बंद करण्यात आली होती.

कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या आसवाणी  विभागाची चिमणी कोसळली तसेच  धोत्रे गावातील 4 शेडचे पत्रे उडाले  काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असे सांगितले तर आम्ही माहिती घेत असून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सावधानतेचा इशारा देत नागरिकांनी खबरदारी घ्यावी शक्यतो घराबाहेर पडू नये असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या