
सामना ऑनलाईन, सातारा
माण तालुक्यात शुगर ग्रीड हा पहिला साखर कारखाना उभारला जाणार आहे. या कारखान्याची पायाभरणी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर होणार आहे. हा कारखाना तालुक्यातील पहिला साखर कारखाना असल्याचं सांगण्यात येत आहे. खटाव तालुक्यातील हरणाई सूतगिरणी व माण तालुक्यातील प्रबोधनकार ठाकरे सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांचा हा साखर कारखाना असणार आहे. हा कारखाना अत्याधुनिक स्वरुपाचा असणार असून यातून सल्फरविहरीत साखरेचे उत्पादन होणार आहे. दसऱ्याला शुभारंभ झाल्यानंतर नऊ महिन्यात हा कारखाना सुरू होणार आहे असं देशमुख यांनी सांगितले आहे.


























































