
सामना प्रतिनिधी । जामखेड
जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या कडभनवाडी येथे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा ऊस जळून खाक झाला मात्र जीवित हानी झाली नाही. ऐन दुष्काळातच तेरावा महिना असे म्हणण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.
या वर्षी पावसाचे प्रमाण कमी आसल्याने सर्वच ठिकाणी टंचाईग्रस्त परीस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्यांची हातची पीके वाया गेली आसुन शिल्लक राहिलेली पीके कशा पद्धतीने जगवावीत असाच प्रश्न शेतकर्यांना पडला असतानाच तालुक्यातील साकत येथील कडभनवाडीमध्ये शेतकर्यांच्या उसाला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. सदरची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. यावेळी आग लागल्यानंतर कडभनवाडी शिवारात माहीत झालेले शेतकरी घटनास्थळाकडे धाव घेत होते. आपली रानातील हातातील कामे सोडून शेतकरी आगेच्या दिशेने धाव घेत होते. प्रत्येक जण लिंबाच्या पाल्याने, फाटके पोतडी घेऊन सर्वजण धावत होते. शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने आग ४ च्या दरम्यान आटोक्यात आली व मोठा अनार्थ टळला. त्या आगीमध्ये गट नं.१८३ मधील रामचंद्र मारुती कडभने यांचा दीड एकर ऊस जळून खाक झाला. आग विजवण्यासाठी महिलांनी विशेष मदत केली सौ.सुशाला संतोष नेमाने, अनिता कदम, पूजा कडभने, कल्पना कडभने, कोंडीराम कदम, दादासाहेब मिसाळ, शहाजी कडभने, ज्ञानेश्वर कडभने, सुरेश नेमाने, निलेश नेमाने, नागनाथ वराट, ईश्वर नेमाने, यांनी विशेष परिश्रम घेतले.गावचे तलाठी महेश धुमाळ, व बबन गायकवाड, विठ्ठल पुलवळे यांनी पंचनामा केला. साकतचे पोलीस पाटील महादेव वराट,महासांगवीचे पोलीस पाटील राजेंद्र कडभने,यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी केली. आगीचे कारण स्पष्ट समजू शकले नाही.





























































