‘मम्मी-मम्मी’ म्हणत टॉवरवर घेतला गळफास, 12 तास मृतदेह लटकत होता

2080

यूपीमधील कन्नौज येथे एका तरुणाने 160 फूट उंच मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्या केली. हा तरुण विशुनगढच्या खारुली गावचा होता. ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली आणि बरीच मेहनत घेतल्यानंतर मृतदेह खाली आणला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे.

160 फूट उंच मोबाइल टॉवरवर मृतदेह लटकलेला पाहून गावात खळबळ उडाली. बघता बघता संपूर्ण गाव घटनास्थळी गोळा झाले होते. नातेवाईकांना माहिती मिळाल्यावर ते देखील टॉवर जवळ पोहोचले. तरूण मुलाला फाशीवर लटकलेले पाहिले तेव्हा त्याच्या घरच्यांचा धीर सुटला. एका युवकाने आपल्या काही सहकाऱ्यांसह मृतक गजेंद्रसिंहचा मोबाईल हिसकावल्याचे सांगितले जात आहे. याचा राग आल्याने त्याने मोबाइल टॉवरवरुन लटकून आपला जीव दिला.

तो ‘मम्मी, मम्मी’ म्हणून तीन वेळा ओरडला असे गावकरी सांगतात. आवाज ऐकून लोक पळत गेले, परंतु तोपर्यंत त्याने स्वत: ला फास देऊन लटकविले. शेजारी राहणार्‍या मित्राने घरी या घटनेची माहिती दिली. थोड्या वेळात घटनास्थळी लोक जमा झाले. गावचे प्रमुख ब्रिजेंद्र सिंह यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

उंचावर लटकल्यामुळे पोलिसांना मृतदेह खाली नेणे अवघड झाले. हा मृतदेह टॉवरवर 12 तासांपेक्षा जास्त काळ लटकला. त्यानंतर पोलिसांनी जिओच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला आणि टॉवरवर चढणाऱ्या तज्ञांच्या मदतीने मृतदेह खाली आणला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.  आजतकने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या