
मुंबई ते मनमाडदरम्यान उन्हाळी विशेष ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा प्रवाशांना मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मुंबई- मनमाड उन्हाळी विशेष ट्रेन्स चालविण्यात येणार आहेत.
02101 ही विशेष ट्रेन 11 एप्रिल ते 15 मे 2022 (35 फेऱ्या) पर्यंत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 15.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20.28 वाजता मनमाड येथे पोहोचेल.
02102 ही दैनिक विशेष गाडी 11 एप्रिल ते 15 मे 2022 (35 फेऱ्या) पर्यंत दररोज मनमाड येथून 08.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 13.28 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल. या विशेष गाड्यांना लासलगाव, निफाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर येथे थांबे असतील.
या ट्रेनमध्ये एक वातानुकूलित चेअर कार, 8 द्वितीय आसन श्रेणी (3 आरक्षित आणि 5 अनारक्षित), गार्ड ब्रेक व्हॅनसह 2 सामान्य द्वितीय श्रेणी असतील.या ट्रेनचे आरक्षण वातानुकूलित चेअर कार आणि 3 द्वितीय आसन श्रेणीसाठी विशेष शुल्कासह बुकिंग 10 एप्रिलपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.



























































