
मला आयुष्यात वाटलं नव्हतं की मी इथे तुमच्याशी बोलेल. परंतु एका क्षणात आपण पोरके झालो. अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांपुढे बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
गेल्या दोन दिवसापासून सुनेत्रा पवार या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर निवडून आलेल्या आपल्या पक्षातील सदस्यांशी संवाद साधत आहेत. बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सदस्यांबरोबर त्यांनी बारामती मध्ये संवाद साधला यावेळी बोलताना सुनेत्रा पवार भाऊक झाल्या.
त्या म्हणाल्या, एका क्षणामध्ये आपण पोरके झालो. अजित दादांनी जीवाचे रान करून पक्ष वाढवला. मला आयुष्यात वाटलं नव्हतं की मी इथे तुमच्याशी बोलेल. अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर प्रथमच त्या नवनिर्वाचित सदस्यांसमोर बोलल्या.
























































