सुनेत्रा पवार बिनविरोध राज्यसभेवर

बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता मागच्या दरवाजाने संसदेत एण्ट्री करणार आहेत. राज्यसभेवर त्या बिनविरोध निवडून गेल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत होती. या जागेसाठी सुनेत्रा पवार यांनी अर्ज केला. या मुदतीपर्यंत अन्य कोणीही अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांच्या उमेदवारी अर्जाची अद्याप छाननी झालेली नाही, पण ही तांत्रिक बाब असल्याचे सांगण्यात येते.