रहाणेला सपोर्ट केला तर माझ्यावर भेदभाव केल्याचा आरोप होईल – गावसकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळत आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी रहाणेने केलेल्या जबरदस्त कॅप्टन्सीचे अनेक दिग्गजांनी कौतुक केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील रहाणेने शतक ठोकत दिवस गाजवला. त्यामुळे सध्या सर्वत्र रहाणेचे कौतुक सुरू आहे.

दरम्यान चांगल्या कामगिरीनंतर रहाणे कसोटीचे कर्णधारपद कोहलीपेक्षा चांगले निभावू शकतो अशी चर्चा सुरू झाली. याबाबत जेव्हा दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांना विचारले असता त्यांनी त्याबाबत प्रतिक्रीया दिली तर माझ्यावर मुंबईकर खेळाडूला पाठिंबा देतो असा आरोप होईल असे म्हटले आहे.

‘मी जर अजिंक्य रहाणेला पाठिंबा दिला तर अनेकजण माझ्यावर आरोप करतील की मी मुंबईचा असल्याने मुंबईतील खेळाडूला पाठिंबा देतोय. आणि तसंही इतक्या लवकर कुठल्याही तर्कावर पोहोचणं बरोबर नाही. त्यामुळे मला आता यात पडायचं नाही’, असे गावस्कर यांनी सोनी स्पोर्ट नेटवर्कशी बोलताना सांगितले आहे.

रहाणेचे केले कौतुक

‘मी रहाणेची कॅप्टन्सी बघितली आहे. त्याला क्षेत्ररक्षणाच्या वेळी योग्य ठिकाणी योग्य खेळाडू उभा करायचा याचे त्याला उत्तम ज्ञान आहे.’, असे गावसकर यांनी सांगितले आहे.