सीमेवर धुमश्चक्री; नगरचे बहाद्दर जवान सुनील वलटे शहीद

485
sunil-valte

जम्मू-काश्मीरात नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला हिंदुस्थानी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत नगर जिह्यातील कोपरगाव तालुक्याचे सुपुत्र दहेगाव बोलका येथील जवान सुनील रावसाहेब वलटे (वय 38) हे शहीद झाले. दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडल्याने कोपरगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शहीद जवान सुनील वलटे हे लष्करात नायब सुभेदार होते.

शहीद सुनील वलटे यांचे वडील रावसाहेब जनार्दन वलटे दहेगाव बोलका येथे शेती करतात. त्यांची मुलगी आठवीत शिक्षण घेत आहे, तर लहान मुलगा संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहे. पत्नी मंगल या गोधेगाव येथील कोळसे परिवारातील आहेत.

शहीद सुनील वलटे यांनी दहावीपर्यंत वीरभद्र विद्यालय दहेगाव येथे शिक्षण घेतले. दहावीनंतर त्यांनी संजीवनी फ्री क्रेडिट ट्रेनिंग सेंटर येथे सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण घेतल़े  1999 मध्ये लष्कराच्या मराठा रेजिमेंटमध्ये भरती झाल़े  जम्मू-कश्मीर, श्रीनगर परिसरात त्यांनी बारा वर्षे सेवा केली. लष्करात त्यांची एकूण वीस वर्षे सेवा झाली होती. सध्या ते जम्मू-कश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये कार्यरत होते.

आपली प्रतिक्रिया द्या