सुनीता विल्यम्स अखेर अंतराळात; बोइंग स्टारलायनरचे यशस्वी उड्डाण

नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अखेर आज संध्याकाळी केप कॅनाव्हेरल येथील प्रक्षेपण तळावरून बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून अंतराळात झेप घेतली. विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विल्मोर यांचे हे उड्डाण काही तांत्रिक समस्यांमुळे आधी दोन वेळा ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. मात्र, आज या यानाने यशस्वीरित्या झेप घेतली आणि अंतराळ यानाचे सारथ्य करणारी पहिली महिला म्हणून सुनीता विल्यम्सची अंतराळ मोहिमांच्या इतिहासात नोंद झाली. विल्यम्स यांनी यापूर्वी दोनवेळा अंतराळात उड्डाण केले असून, एकूण 322 दिवस कक्षेत घालवले आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील कर्मचारी, संशोधक यांच ने-आण करण्यासाठी तयार केलेल्या यानाचे हे चाचणी उड्डाण आहे. आधीच्या अंतराळ मोहिमांत सर्वाधिक स्पेसवॉक (7) आणि स्पेसवॉक टाइम (50 तास, 40 मिनिटे) असे विक्रम सुनीता यांच्या गाठीशी आहेत.