अंतराळात अनेक महिन्यांपासून अडकून पडलेल्या सुनीता विल्यम्स आणि बच विल्मोर यांना परत पृथ्वीवर आणण्याची तयारी सुरू झाली आहे. दोघांना आणण्यासाठी स्पेसएक्सवर स्वार होऊन ‘क्रू 9 मिशन’ अंतर्गत निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह पोचले आहेत. सुनीता विल्यम्स जरी फेब्रुवारीत पृथ्वीवर येणार असली तरी त्याची तालीम आतापासून सुरू झाली आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्स आणि बच विल्मोर यांनी पहिल्यांदा स्पेसएक्स इंट्राव्हिक्युलर ऑक्टिविटी सूट घालून सराव केला. पृथ्वीवर परतताना हा सूट त्यांना घालावा लागेल. याशिवाय दोघांनी ऑडियो टेस्टमध्ये सहभाग घेतला.