बूट पॉलिश करणारा सनी बनला इंडियन आयडॉल

3301

बूट पॉलिश करून आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाला हातभार लावणारा भटिंडाचा सनी हिंदुस्तानी इंडियन आयडॉलच्या अकराव्या सीजनचा विजेता ठरला आहे. 25 लाख रुपये आणि ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तर मराठमोळा रॉकस्टार रोहित राऊत हा उपविजेता ठरला आहे.

इंडियन आयडॉल 11 च्या अंतिम फेरीत भटिंडाचा सनी हिंदुस्तानी, महाराष्ट्राचा रोहित राऊत, कोलकाताचा अद्रिज घोष आणि अंकोना मुखर्जी, अमृतसरचा रिधम कल्याण यांचा समावेश होता. आदित्य नारायण-नेहा कक्कर, हिमेश रेशमिया, विशाल दादलानी यांच्या रंगतदार परफॉर्मन्सने महाअंतिम सोहळ्याला चार चाँद लावले. आपल्या सुरांनी सर्वांची मने जिंकणाऱया सनीने कंगना रनौतच्या ‘पंगा’ सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या