
दिल्लीतील 70 वर्षीय रोशनी देवी सांगवान यांच्या फिटनेसची गोष्ट खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. 2022 साली आजींच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांचे चालणं-फिरणं कठीण झालं, रोजच्या कामांसाठीही त्यांना आधार घ्यावा लागत होता. उपचार म्हणून फिजिओथेरपी सुरू झाली. त्यांच्या मुलानं त्यांना खचू दिलं नाही. फिजिओथेरपीनंतर त्यानं आईला जिममध्ये जाण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला रोशनी देवी घाबरल्या होत्या; पण हळूहळू त्यांनी सराव सुरू केला. साध्या व्यायामापासून सुरुवात करीत त्यांनी वजन उचलण्यापर्यंत मजल मारली. आज त्या तब्बल 150 किलो वजन उचलतात. आता त्यांची तब्येत सुधारलीय, वेदना कमी झाल्यात आणि आत्मविश्वास वाढलाय. आजींचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय.



























































