
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने केली आहे. त्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमची बैठक नुकतीच पार पडली. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यामुळे रिक्त जागेवर त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय कॉलेजिअमने घेतला.