मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज निकाल

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर उद्या बुधवारी अंतिम सुनावणी होणार आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. मराठा आरक्षण वैध ठरवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम निकाल येईल. मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्राला न्याय मिळेल, असा आशावाद राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वेच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान 50 टक्क्यांवर आरक्षण देता येते का यावर महाराष्ट्र सरकार तसेच याचिकाकर्त्यांच्या बाजूने युक्तीवाद झाल्यानंतर केंद्र सरकारकडूनही 102 व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यांचे अधिकार नाकारता नाहीत, असे म्हणणे मांडण्यात आले होते. यासोबत सुप्रीम कोर्टानं पाच सदस्यीय घटनापीठानं 1992 मधील इंद्रा सहानी प्रकरणातील निकालामध्ये आरक्षणावर 50 टक्केंची जी मर्यादा घालण्यात आली होती त्याचा फेरविचार करावा की नाही याबाबतचा निकालदेखील राखून ठेवला असून त्यावर आज सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या