सुप्रीम कोर्टात प्रत्यक्ष सुनावणी सुरू होणार

414

सर्वेच्च न्यायालयातील किमान दोन ते तीन कोर्टरुममध्ये पुढील आठवडय़ापासून प्रत्यक्ष सुनावणी पूर्ववत सुरू होण्याची चिन्हे आहेत. सरन्यायाधीशांनी स्थापन केलेली सात सदस्यीय समिती याबाबत पुढील दोन दिवसांतच निर्णय घेणार आहे.

सरन्यायाधीशांनी नेमलेल्या सात सदस्यीय समितीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत प्रत्यक्ष सुनावणी पुन्हा सुरू करण्यासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला वकिलांच्या विविध संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते. कोरोनाचा फैलाव होणार नाही, या दृष्टीने तज्ञांनी सुचवलेल्या खबरदारीच्या उपाययोजना राबवून लवकरात लवकर ऑनलाईन सुनावणीबरोबरच प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती सर्क वकिल संघटनांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या