
निष्पक्ष सुनावणीकरिता ईडीने नोंदवलेल्या जबाबाची प्रत आणि चौकशीदरम्यान गोळा केलेली कागदपत्रे मिळविण्याचा आरोपीला अधिकार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. न्यायाधीश अभय एस. ओक आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत कोर्टाने हे निर्देश दिले. तक्रारीची दखल घेतल्यानंतर संबंधित प्रकरण हाताळणाऱया विशेष न्यायाधीशांनी तक्रारीसह अन्य कागदपत्रांच्या प्रती आरोपीला द्याव्यात. तपास अधिकारी ज्या जबाबांवर अवलंबून नाहीत असे जबाब, कागदपत्रे, साक्षीदारांच्या यादीची प्रतदेखील आरोपीला पुरवावी, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.