वर्मा तुमचे मित्र आहेत का? मर्यादा पाळा! आडनावाने बोलावले; सरन्यायाधिशांनी वकिलाला फटकारले

supreme court

सर्वोच्च न्यायालयाने आज अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना त्यांच्या आडनावाने बोलावणाया वकिलाला फटकारले. ते तुमचे मित्र आहेत का, मर्यादा पाळा, अशा शब्दांत सुनावले. वकील मॅथ्युज नेदुम्परा यांनी न्यायमूर्ती वर्मा यांना केवळ वर्मा असो संबोधले होते, यावरून सरन्यायाधीश बी आर गवई संतापले.

न्यायमूर्ती तुमचे मित्र नाहीत, ते अजूनही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. तुम्ही त्यांना कसे बोलावत आहात, थोडी तरी मर्यादा पाळा, तुन्ही एका विद्वान न्यायमूर्तीशी बोलत आहात, असे सरन्यायाधीश म्हणाले. यावर मला वाटत नाही की त्यांना इतका सन्मान द्यायला हवा, असे वकील म्हणाले. त्यानंतर सरन्यायाधीशांचा पारा आणखी चढला. कृपया कोर्टाला ऑर्डर देऊ नका, असे सरन्यायाधीशांनी मॅथ्यूज यांना दरडावले. तसेच मॅथ्यूज यांनी दाखल केलेली याचिकाही फेटाळून लावली. मॅथ्यूज यांनी वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.