
उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्थगिती दिली आहे. या निर्णयाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले आहे. आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी आपले परखड मत मांडले आहे. बलात्कार प्रकरणातील दोषीला जामिनावर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा स्थगिती दिल्याचे पाहून समाधान वाटले, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
It’s good to see another stay from the Hon’ble Supreme Court on the bail of Rape Convict Kuldeep, ex MLA of bjp.
It was truly horrendous and disgusting to see how a rape convict can be let easy by law, and miscarriage of justice.
I hope the Supreme Court ensures the harshest…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 29, 2025
आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत ट्वीट केले आहे. या प्रकरणावर भाष्य करताना आदित्य ठाकरे यांनी न्यायव्यवस्थेतील त्रुटींकडे लक्ष वेधले. एका बलात्कार प्रकरणातील दोषीची कायद्याच्या कचाट्यातून अशा प्रकारे सहज सुटका होणे हे अत्यंत भयानक आहे. हा खऱ्या अर्थाने न्यायाचा अपमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बलात्काराचा दोषी भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर याच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्थगिती दिली हे पाहून आनंद झाल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. भाजपचा माजी आमदार आणि बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सेंगर याला सर्वोच्च न्यायालय कठोर शिक्षा देईल, अशी मला आशा आहे,” असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.






























































