सिसोदिया यांच्या जामिनाविषयी आज सुप्रीम कोर्टाचा निकाल

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देणार आहे. न्या. गवई आणि न्या. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने 6 ऑगस्ट रोजी हा निकाल राखून ठेवला होता.

ईडी आणि सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यांमध्ये दिरंगाई होत असल्याकडे लक्ष वेधत सिसोदिया यांनी जामिनाची मागणी केली आहे.