काही घोटाळा आढळल्यास ‘एसआयआर’ रद्द करणार, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला इशारा

supreme court

बिहारमधील मतदार फेरछाननीसाठी (एसआयआर) निवडणूक आयोगाने अवलंबलेल्या कार्यपद्धतीत काही बेकायदेशीर आढळून आल्यास संपूर्ण प्रक्रियाच रद्द करून टाकू आणि जो आदेश असेल तो संपूर्ण देशातील निवडणूक प्रक्रियेला लागू असेल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. न्यायमूर्ती सूर्या कांत व जोयमाला बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. अंतिम सुनावणी 7 ऑक्टोबरला होणार आहे.