सुप्रिया यांची नवी वेबसीरिज ‘होम’

 

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर लवकरच ‘होम’ नावाच्या वेबसीरिजमधून झळकणार आहे. ही वेबसीरिज एकता कपूर आणि हबीब फैसल यांनी तयार केली आहे. ऑगस्टअखेरीस ही वेबसीरिज प्रसारित होणार आहे. ही वेबसीरिज भावुक स्वरूपाची असून घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍यांवर आधारित आहे. ‘होम’ ही एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा असून यात सुप्रिया स्कूटर चालविताना दिसणार आहे. अलजीद्वारे निर्मित या वेबसीरिजमध्ये एका सोसायटीची कहाणी दाखविली जाणार आहे.