Supriya Sule News – लाडकी बहीण योजनेत भोंगळ कारभार, सुप्रिया सुळे यांची टीका

लाडकी बहीण योजनेत प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच या सरकारकडून काही अपेक्षा नाही असेही सुळे म्हणाल्या.

धुळ्यात पत्रकारांनी सुळे यांना लाडकी बहीण योजनेवर प्रश्न विचारले. तेव्हा सुळे म्हणाल्या की अनेक ठिकाणी बँकेत प्रशासानाचा भोंगळ कारभार पहायला मिळाला. अनेक महिलांना त्रास सहन करावा लागला. या सरकारकडून तशाही काही अपेक्षा नाहीत. हे प्रशासनाचे अपयश असून त्यांनी या गोष्टीचा विचार करायला लावला होता. स्वतःच्या स्वार्थासाठी हे एकत्र आलेले हे सरकार आहे असेही सुळे म्हणाल्या.

सावत्र भावाने चुकीचे फॉर्म भरले म्हणून काही फॉर्म रिजेक्ट झाले असा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला होता. पण वेब पोर्टलवर जर फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरली तर तो फॉर्म रिजेक्टच होणार असे सुळे म्हणाल्या. तसेच हा महायुतीचा रडीचा डाव आहे असा टोलाही त्यांनी लगावला.