राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे येथे त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सिद्दिकी यांच्या हत्ये वर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया व्यक्त करताना राज्यातील सुरक्षा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उभे केले आहेत.
अतिशय धक्कादायक! मुंबईतील माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले. पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र झीशान यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी, असे सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे.