
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ”तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात, महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही’, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासगी कॉलेजच्या प्राध्यपकांच्या पगाराच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांवर टीका केली.
”एखादा मंत्री जेव्हा बोलतो तेव्हा त्याने लाईटली घ्यायचं नसतं, चेष्ठाही करायची नाही. त्याला गंमत जंमत करायचा अधिकार नाही. ही काय महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही. तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात. तुम्ही जे काही भाषण करता ते विचार करूनच भाषण तेसं पाहिजे. असे महाराष्ट्राचे मंत्री बेजबाबदारपण भाषण करतायत”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.