दिव्यांग उमेदवार एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अपात्र आहे असा अहवाल तज्ञाकडून सादर केला जात नाही, तोपर्यंत त्याचा प्रवेश रोखता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वेच्च न्यायालयाने दिला आहे. दिव्यांग विद्यार्थ्याच्या वैद्यकीय प्रवेशासाठी 40 टक्क्यांपर्यंत अपंगत्वाचे निकष निश्चित केले असले तरी, त्याला प्रवेश टाळता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले.
दिव्यांग विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत नसल्याचे दिव्यांग मूल्यांकन मंडळाने सांगितल्यास दिव्यांग विद्यार्थ्याला अपात्र ठरविता येईल, तोपर्यंत त्याचा प्रवेश रोखता येणार नाही, असा निर्णय न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती के. व्ही विश्वनाथ आणि न्यायमूर्ती अरविंद पुमार यांच्या खंडपीठाने दिला. ओंकार हा 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांग असल्याने एमबीबीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून त्याला रोखण्यात आले.