मी दिशा सालियनला आयुष्यात कधी भेटलो नव्हतो, सूरज पांचोलीचे स्पष्टीकरण

2923

सुशांत सिंग राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या आत्महत्येप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिशा व सुरज पांचोलीचे संबंध होते व त्यामुळे ती गरोदर राहिली होती अशी चर्चा सध्या बीटाऊनमध्ये सुरू आहे. त्यामुळे जिया खाननंतर आणखी एका आत्महत्या प्रकणात सुरज पांचोलीचे नाव समोर आले आहे. मात्र सुरजने हे आरोप फेटाळले असून त्याने तो दिशाला ओळखतही नव्हता असा दावा केला आहे.

नुकतीच एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली असून त्यात दिशा ही सुरजच्या मुलाची आई होणार होती असा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्या कारणावरून सुशांत सिंग राजपूत व सुरज पांचोली यांच्यात 2017 मध्ये वादही झाला होता. त्या तसेच सुरजला वाचविण्यासाठी सलमान खान मध्यस्थी करत होता. सलमान सुरज पांचोलीला वाचविण्याचा प्रयत्न करत होता, असा आरोप त्या पोस्ट मधून करण्यात आला आहे.

या प्रकरणी सुरज पांचोलीने मौन सोडले असून आपण कधीच दिशा सालियनला भेटलो नसल्याचे त्याने म्हटले आहे. ‘सुशांतच्या आत्महत्येनंतर मला दिशा सालियनविषयी समजले. मी आयुष्यात कधीच तिला भेटलो नाही. त्यावरून माझे सुशांतचे वाद झाल्याची देखील चर्चा आहे. मात्र माझा सुशांतचा कधीच वाद झाला नाही. 2017 ,साली तसे एक आर्टीकल आले होते त्यानंतर सुशांतने मला फोनकरून त्या विषयी सांगितले. त्यात सलमान खान त्याच्यावर रागवल्याचा उल्लेख होता. त्यांनंतर त्याने मला त्यावर मीडियासमोर स्पष्टीकरण द्यायला सांगितले. काही दिवसांनी आम्ही डिनरसाठी एका मित्राच्या घरी भेटलोही. त्यावेळी आम्ही भांडत असल्यासारखे फोटोही काढले. तो मला त्याच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला बोलवायचा. आमचं प्रत्यक्षात कधी भांडण झालंच नव्हतं’,असं सुरजने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या