धोनी पाठोपाठ सुरेश रैनाचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

1185

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्स आणि टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला असून निवृत्तीची घोषणा केली आहे.

सुरेश रैना याने 2005 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मधल्या फळीत तुफान फलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण यात रैनाचा हातखंडा होता. आपल्या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत रैनाने हिंदुस्थानकडून 18 कसोटी, 226 एक दिवसीय आणि 78 टी-20 सामने खेळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 7 हजारांहून अधिक धावांची नोंद आहे.

– कसोटीत रैनाने 778 धावा केल्या. यात त्याच्या एका शतकाचा आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.

– एक दिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 5 शतक आणि 36 अर्धशतकांच्या मदतीने 5615 धावा केल्या. 116 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

– टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतक यांच्या सहाय्याने 1605 धावा केल्या.

सुरेश रैना याने 2018 मध्ये आपला अखेरचा वन डे व ट्वेंटी-20 सामना खेळला होता, तर 2015 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

आपली प्रतिक्रिया द्या