आश्चर्य… तरुणाने केले बहिणीशी लग्न! कुणीही केला नाही विरोध

चीनमध्ये एका तरुणाच्या लग्नाच्या दिवशी आश्चर्यकारक घटना घडली. तो ज्या तरुणीशी त्याचे लग्न ठरले होते ती तरुणी चक्क त्या तरुणाची लहानपणी हरवलेली बहीण होती.

चीनमधील जिआनग्सू प्रांतातील सोझोउ येथे 31 मार्च रोजी एका तरुणाचे लग्न होते. विवाहाचे विधी सुरू असताना तरुणाच्या आईने आपल्या होणाऱ्या सूनेला पाहिले. तेव्हा तिला जबर धक्का बसला आणि ती रडायलाच लागली.

कारण ज्या तरुणीबरोबर तिच्या मुलाचे लग्न होत होते, ती तरुणी त्याची सख्खी बहीण होती. तिच्या हातावर असलेली जन्मखूण नवऱ्याच्या आईने पाहिली आणि आपल्या मुलीला ओळखले. ही तरुणी लहानपणी हरवली होती.

तरुणीच्या हातावरील जन्मखूण बघितल्यावर तरुणाच्या आईने तिच्याकडे तिचे सध्याचे आई-वडील कोण याबाबत चौकशी केली असता तिने सांगितले की, 20 वर्षांपूर्वी तिला दत्तक घेण्यात आले होते. तसेच तिला दत्तक घेतलेल्या तिच्या सध्याच्या आई-वडिलांनी सांगितले की, ही मुलगी लहान असताना रस्त्याच्याकडेला बराच वेळ पडून होती. तिथून आम्ही तिला घरी आणले. तेव्हापासून ती आमच्याच घरी आहे. ही गोष्ट आम्ही कोणालाही सांगितली नव्हती.

आपल्या खऱ्या आईवडिलांचा शोध लागल्याचे पाहताच अत्यंत आनंदात असलेली नवरी रडू लागली, मात्र आश्चर्य म्हणजे हे लग्न मोडले नाही, यामुळे या प्रसंगाला नवे वळण लागले. कोणीही या लग्नाला विरोध केला नाही.

या प्रसंगानंतर नवरीच्या खऱ्या आईने सांगितले की, आमची मुलगी हरवल्यानंतर आम्ही तिचा खूप शोध घेतला, पण ती कुठेच सापडली नाही. म्हणून आम्हीही मुलगा दत्तक घेतला. आता त्याच मुलाशी आमच्या मुलीचे लग्न होत आहे. त्यानंतर विवाह सोहळ्याला आलेल्या पाहुण्यांनी खूप वर्षांनी भेटलेल्या मुलीला आणि आईला शुभेच्छा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या