सुशांतच्या ‘दिल बेचारा’ने रचला इतिहास! अॅव्हेंजर्सलाही टाकले मागे

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा ’दिल बेचारा’ हा शेवटचा चित्रपट डिजिटल रिलीज होणार असून नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी चाहत्यांच्या अक्षरशः उडय़ा पडल्या असून एका दिवसात दिल बेचाराच्या ट्रेलरला 50 लाख ह्यूवज् मिळाले आहेत. यापूर्की हा रेकॉर्ड हॉलीवूडच्या अॅव्हेंजर्स एंडगेमच्या नावावर होता. या चित्रपटाच्या ट्रेलरला एका दिवसात 32 लाख ह्यूवज् मिळाले होते.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडसह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र आपल्या लाडक्या अभिनेत्याचा शेवटच्या चित्रपटाचे स्वागत करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यामुळे ट्रेलर रिलीज होताच चित्रपटाने इतिहास रचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या