सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवा, हायकोर्टात याचिका

310
bombay-high-court-1

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात यावी. अशी मागणी करत नागपूर येथील एका रहिवाशांने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या याचिकेकर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

14 जून रोजी सुशांतचा मृतदेह वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. तर सुशांतचे वडिल के के सिंग यांनी बिहारच्या पाटणा पोलिसांत सुशांतची प्रेयसी रिया चक्रकर्ती हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलीस या प्रकरणात मुद्दाम विलंब करीत आहेत. तसेच पुरावेही नष्ट करत आहेत असा आरोप करत समित ठक्कर यांनी ऍड. रसपाल सिंग रेणू यांच्या मार्फत हायकोर्टात आज याचिका दाखल केली. या प्रकरणाची चौकशी एसआयटी अथवा सीबीआय तर्फे करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी याचिकेतून केली. सुशांतचा बळी बॉलिवूडच्या राजकारणामुळे तसेच नातलगांसाठी दाखविण्यात येणार्‍या वशिलेबाजीमुळे गेला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर ही त्याचे ट्विटर, इन्स्टाग्राम कोणाकडून तरी वापरण्यात आल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

मुंबई पोलीस फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक करणार

सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलीस आता फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक करणार आहे. फॉरेन्सिक ऑडिटर हे सुशांतच्या बँक खात्याची तपासणी करणार आहेत.

सुशांतच्या आत्महत्येनंतर बँक खात्यातील पैशाबाबत त्याच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. वांद्रे पोलिसांनी सीएचा जबाब नोंदवला आहे. बँक खात्यातील तपशिलाबाबत मुंबई पोलीस हे फॉरेन्सिक ऑडिटर नेमणार आहेत. फॉरेन्सिक ऑडिटर हे सुशांतचे करिअरची सुरुवात झाल्यापासून ते आता पर्यंतचे सर्व बँक खात्याचे तपशील तपासणार असल्याचे समजते. नुकतेच तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांच्या पथकाने सोमकारी दोन जणांचे जबाब नोंदवल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या