सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, आरोपींच्या जामीन अर्जावर 29 सप्टेंबरला सुनावणी

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी एनसीबीकडून (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) अटक करण्यात आलेल्या आरोपींचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर या आरोपींनी सुटकेसाठी हायकोर्टात अर्ज केला आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर आज पार पडलेल्या सुनावणी वेळी सरकारी पक्षाने याचिकेला उत्तर देण्यासाठी वेळ मागितला. हायकोर्टाने सरकारला अवधी देत 29 सप्टेंबर पर्यंत सुनावणी तहकूब केली.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीचा सहकारी सॅम्युअल मिरांडा याला ड्रग्स प्रकरणात तर ड्रग्ज पेडलर अब्दूल बासीत परिहार आणि सुशांतच्या घरी काम करणाऱया दीपेश सावंत याला अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयानी या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर या तिघांनी हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला. आज न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी एनसीबी तसेच केंद्राने याबाबत उत्तर देण्यासाठी वेळ मागितला हायकोर्टाने हा अवधी देत सुनावणी 29 सप्टेंबर पर्यंत तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या