
पुरामुळे गेले तीन दिवस घरातच अडकून पडलेले बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची अखेर एनडीआरएफ आणि राज्य आपत्कालीन दलाच्या जवानांनी सुटका केली. गेले काही दिवस परतीच्या पावसाने उत्तर हिंदुस्थानला चांगलेच झोडपले असून उत्तर प्रदेश आणि बिहारला याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. बिहारमध्ये पावसामुळे आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे.
बिहारमध्ये मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे पाटना शहर पाण्याखाली गेले आहे. पटनात उपमुख्यमंत्र्यांसह सुशीलकुमार मोदी, मंत्री प्रेम कुमार, भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांच्यासह अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. सुशीलकुमार गेले तीन दिवस त्यांच्या राजेंद्रनगरमधील जुन्या घरात अडकले होते. त्यांची सोमवारी दुपारी सुटका झाली.























































