शिवसेना नेते संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांना रुग्णालयात हजर करताना एकदाही माध्यमांशी बोलण्याची संधी मिळत नव्हती. मग सचिन वाझेला ही संधी कशी मिळाली? गेल्या पंधरा दिवसांपासून अनिल देशमुख पत्रकार परिषदा घेत असताना त्याच वेळी सचिन वाझे लेटर बॉम्ब टाकतो. एवढे दिवस सचिन वाझे झोपला होता का? पत्रच लिहायचे होते तर ते न्यायसंस्थेशी संबंधित सीबीआयसारख्या संस्थेला लिहायला हवे होते. फडणवीसांना पत्र लिहण्याचा वाझेचा काय संबंध?. फडणवीस हे सीबीआयचे डायरेक्टर आहेत का? असा सवाल शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस हे अर्थमॅटिक आणि फेक नरेटिव्ह या शब्दांचा वारंवार उल्लेख करत आहेत, मात्र त्यांना अर्थमॅटिकमधले ढेकळ कळत नाही. ते धादांत खोटे बोलत आहेत, असे त्या म्हणाल्या.