इंस्टाग्राम पोस्टमुळे सुक्ष्मिता सेनवर टिकेचा भडीमार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिची वेब सिरीज ‘आर्या 3’ मुळे चर्चेत आहे. दरम्यान सुष्मिता सेनने सध्या चर्चेत आली आहे. सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने राजकारणावर एक पोस्ट शेअर केली आणि तिच्यावर टिकेचा भडीमार झाला.

अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती कायम आपली मतं रोखठोक मांडत असते. पण यावेळी तिने केलेली पोस्ट तिला भारी पडली आणि चहूबाजूने तिच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. झालं असं की, मागच्या काही दिवसांमध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रत्येकजण राममय झाले होते. त्याच दिवशी सुष्मिता सेनने राजकारणावर एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमुळे तिचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर भारतीय संविधानाची प्रस्तावना शेअर केली होती. ज्याला सिनेनिर्माते अतुल मोन्गिया यांनी पोस्ट केली होती. त्याच्या फोटोओळीमध्ये लिहीले होते की, ”भारत, मला माझ्या देशावर प्रेम आहे. द्वेशाचे राजकारण या प्रेमाला बदलू शकत नाही”. सुष्मिताने अतुल मोन्गिया यांची पोस्ट आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आणि लिहीले, “मातृभूमी” सोबतचं असे लिहीत पुढे हार्ट आणि हात जोडणारी इमोजीही शेअर केली होती. मात्र सुष्मिता सेनने शेअर केलेली ही पोस्ट पाहिल्यानंतर यूजर्स संतापले आणि ही पोस्ट राम मंदिराबाबत असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले. राम मंदिराला सुष्मिताने एकप्रकारे विरोध केला असल्याचे मत नेटकरी व्यक्त करताना दिसत आहेत.

एका युजरने लिहीले, सुष्मिता सेन पीएचडी लेवलची मूर्ख असेल, कारण ती राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला द्वेषपूर्ण म्हणत आहे. ही स्वत: द्वेषपूर्ण आहे. कारण लोकांच्या भावना हिला समजत नाहीत.” तर अन्य एका युजरने आता मी सुष्मिताचा आदर करत नाही. जे लोक त्यांच्या सभ्यतेसाठी उभे राहू शकत नाहीत त्यांचे अनुसरण करणे योग्य नाही. एकाने लिहिले आहे, 500 वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिराची निर्मिती झाली आहे. सुष्मितासाठी हे द्वेषपूर्ण राजकारण आहे. तिच्यावर उदारमताचा इतका प्रभाव पडला आहे की, ती मुघलांनी हिंदू धर्माच्या प्रतिकांवर केलेले आक्रमण ती विसरली आहे.