
उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या 27 वर्षीय परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला. भाड्याच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही तरुणी वाराणसीतील चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गढवाली टोला परिसरात वास्तव्यास होती. ती मूळची रोमानियाची रहिवासी आहे. फिलीप फ्रान्सिका असे तिचे नाव आहे. तत्त्वज्ञान या विषयात ती पीएच.डी. करत होती. फ्रान्सिका राहात असलेल्या खोलीचा दरवाजा शुक्रवारी रात्री बराच वेळ उघडला नाही. त्यामुळे घर मालकाने स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घर मालकाकडे असलेल्या डुप्लिकेट चावीने दार उघडले.