स्वाध्याय परिवाराकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेस फॉगिंग मशिन्स प्रदान

441

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याय परिवारातर्फे महानगरपालिकेस निर्जंतुकीकरण करण्यासाठी फॉगिंग मशिन प्रदान करण्यात आली. या मशिन्सद्वारे संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

कल्याण-डोंबिवली शहराच्या गल्लीबोळात हे मशिन्स पोहोचून निर्जंतुकीकरण करण करण्यात येत आहे. अशा फवारणीद्वारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल या हेतून सामाजिक भान राखत हे मशिन्स देण्यात आले आहेत. या मशिन्स उपलब्ध करून दिल्याबद्दल महापालिकेने आभार व्यक्त केले आहेत. ‘महापालिकेस सदर मशिन उपलब्ध करून दिल्याबद्दल स्वाध्याय परिवाराचे तसेच स्वाध्याय परिवाराच्या आदरणीय दीदी धनश्री तळवळकर यांचे मनापासून आभार. असेच सहकार्य पुढेही मिळत राहील अशीही अपेक्षा आहे,’ अशा शब्दात पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

याआधी देखील मुंबई ठाण्यासह नाशिक, संभाजीनगर अशा विविध शहरात स्वाध्याय परिवारातर्फे फॉगिंग मशिन, मास्क, किट पोहोचवण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या