डॉ. श्रीनिवास तळवलकर यांचे देहावसान, स्वाध्याय परिवारावर शोककळा

dr shrinivas-talwalkar swadhyay pariwar

स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांचे जावई व स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर (दीदी) यांचे यजमान, डॉ. श्रीनिवास नीळकंठ तळवलकर (रावसाहेब) यांचे अल्पशा आजाराने दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी दु:खद देहावसान झाले. ते 72 वर्षांचे होते.

हिंदू कॉलनी माटुंगा येथे त्यांचे निवासस्थान होते. हिंदू कॉलनीती तळवलकर इस्पितळाचे तसेच रहेजा इस्पितळाचे संस्थापक सदस्य असलेले ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ कै. डॉ. नीळकंठ तळवलकर यांचे रावसाहेब तळवलकर हे सुपुत्र होते.

स्वाध्याय परिवाराचे प्रचंड मोठे वैश्विक कार्य सांभाळत असताना रावसाहेबांची अत्यंत मोलाची खंबीर साथ दीदींना सतत होती. अखिल स्वाध्याय परिवारात रावसाहेब तळवलकर हे अत्यंत आदरणीय व लाडके व्यक्तिमत्व होते. रावसाहेब तळवलकर यांच्या अचानक जाण्याने स्वाध्याय परिवारातील लाखों स्वाध्यायींवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठात 19 जानेवारी रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील. परंतु सध्याच्या कोव्हिड 19 च्या निर्बंधांमुळे अंत्यसंस्कार प्रसंगातील काही निकटच्या व्यक्तीच केवळ उपस्थित राहणार आहेत. स्वाध्याय परिवार घरूनच सायंकाळी 5 ते 7 यावेळात श्रीमद्भगवद्गीतेच्या 9,12,15,16 अध्यायाचे पारायण करून श्रद्धांजली वाहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या