
आपल्या स्वयंपाकघरात बटाटे आणि रताळे दोन्ही असतात. परंतु यापैकी आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. बटाट्याला भाज्यांचा राजा म्हणून ओळखले जाते. तर रताळे हे गोड चवीसाठी आणि त्यातील असलेल्या पोषक तत्वांसाठी ओळखले जातात. आपल्या आतड्यांचे आरोग्य केवळ पचनपुरते मर्यादित नाही. आतड्यांचे चांगले आरोग्य थेट रोगप्रतिकारक शक्ती, रक्तातील साखर नियंत्रण, वजन आणि अगदी मूडशी जोडलेले आहे.
हाॅटेलसारखे पराठे घरी होत नाहीत, चला तर मग फाॅलो करा या टिप्स
आपण आहारात जे खातो ते फार महत्त्वाचे मानले जाते. बटाटे कार्बोहायड्रेट्सने समृद्ध मानले जातात, परंतु त्यात काही घटक असतात जे आतड्यांसाठी फायदेशीर मानले जातात. बटाट्यामध्ये आढळणारा प्रतिरोधक स्टार्च लहान आतड्यात पचत नाही तर थेट मोठ्या आतड्यात पोहोचतो. तिथे ते चांगल्या बॅक्टेरियासाठी अन्न म्हणून काम करते आणि आतड्यांचे मायक्रोबायोम मजबूत करते. बटाट्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि बी6 देखील असतात, जे पचन प्रक्रियेला आधार देतात. परंतु एखाद्याला गॅस, आम्लता किंवा पोटफुगीचा त्रास होत असेल तर बटाट्याचे जास्त सेवन धोकादायक असू शकते.
हिवाळ्यात उकडलेल्या अंड्याला सूपरफूड का मानले जाते, जाणून घ्या
रताळे हे बटाट्यांपेक्षा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. रताळ्यामध्ये फायबर आणि प्रीबायोटिक असतात. आतड्यांच्या आरोग्यासाठी हे फार गरजेचे असतात. रताळ्याच्या सालींमध्ये फायबर भरपूर असते, जे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देते. रताळ्यामुळे आपले पचन सुधारण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते. रताळ्यामध्ये प्रतिरोधक स्टार्च देखील मुबलक प्रमाणात असतो. यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते आणि पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते.
मसूर डाळ आणि भात खाणे हे आपल्या आरोग्यासाठी का गरजेचे आहे, जाणून घ्या
रताळ्यामध्ये बटाट्यांपेक्षा जवळजवळ दुप्पट फायबर असते. हे फायबर योग्य पचन राखण्यास, पोटफुगी कमी करण्यास आणि आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते. बटाट्यांमध्ये कमी फायबर असले तरी, त्यांचा प्रतिरोधक स्टार्च आतड्यांतील बॅक्टेरियासाठी फायदेशीर आहे. बटाटे असोत किंवा रताळे तळल्याने किंवा अति मसल्यांचा वापर केल्याने यातील पोषण मूल्य कमी होते. म्हणूनच बटाटे किंवा रताळे उकडवून खाणे अधिक उत्तम.


























































