स्वीस बँकेत डझनभर हिंदुस्थानींची बेवारस खाती!

704

स्वीस बँकामध्ये हिंदुस्थानींच्या सुमारे डझनभर खात्यांवर दावा करण्यासाठी कोणीही दावेदार पुढे आलेला नाही. गेल्या सहा वर्षांपासून ही खाती निष्क्रीय आहेत. या खात्यांमधील पैशांवर दावा करण्यासाठीही कोणी पुढे आले नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे ही खाती बेवारस आहेत.

स्वीस बँकेतील निष्क्रीय खात्यांची माहिती सार्वजनिक करण्यास स्वीस प्रशासनाने सुरुवात केली होती. या खात्यांवर दावा करून बँक खात्यातील  रक्कम काढण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. हिंदुस्थानींच्या या बेवारस खात्यांपैकी काहीजण अनिवासी हिंदुस्थानी असून काही परदेशात स्थायिक झाले आहेत. मात्र, सुमारे सहा वर्षांपासून या खात्यातील रकमेवर दावा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही.

ठरलेल्या मुदतीत या खात्यांवर कोणीही दावा केला नाही तर या खात्यातील रक्कम स्वीस प्रशासनाला हस्तांतरीत होणार आहे. काही खात्यांवर दावा करण्याचा कालवधी पुढील महिन्यात संपणार आहे. तर काही खात्यांवर दावा करण्याची मुदत 2020 पर्यंत आहे. विशेष म्हणजे यातील काही बेवारस खात्यांवर पाकिस्तानी नागरिक दावा करत असल्याचे समोर आले आहे. तसेच काही स्थानिक आणि इतर देशातील नागरिकांच्या खात्यांवरही  दावा करण्यात आला आहे.

डिसेंबर 2015 मध्ये पहील्यांदा  स्वीस  बँकेतील खात्यांची यादी सार्वजनिक करण्यात आली होती. यात 2,600 खात्यांमध्ये 4.5 स्विस फ्रँक म्हणजे 300 कोटी रुपये कोटी होते. 1955 सालापासून या रकमेवर कोणीही दावा केलेला नाही. दरम्यान, या अशा बेवारस खात्यांमध्ये दरवर्षी वाढ होत असल्याची माहिती बँकेने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या