टीम इंडियाचा विजयरथ सुसाट असून अफगाणिस्तानला पाणी पाजल्यावर बांग्लादेशचा सुद्धा टीम इंडियाने सुपडा साफ केला आहे. सुपर 8 मध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पंड्याने (27 चेंडू 50 धावा) केलेल्या वादळी खेळीमुळे टीम इंडियाने बांग्लादेशला 197 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना कुलदीपच्या जादूई फिरकीच्या जाळ्यात बांग्लादेशी फलंदाज अडकले आणि 50 धावांनी त्यांचा परभाव झाला. या विजयामुळे टीम इंडियाचे सेमी फायनलचे तिकीट जवळपास निश्चित झाले आहे.
WT20 2024. India Won by 50 Run(s) https://t.co/UDl6GDmecg #T20WorldCup #INDvBAN
— BCCI (@BCCI) June 22, 2024