T20 World Cup – कोण मारणार सर्वाधिक षटकार? कोणाची गोलंदाजी उडवणार फलंदाजांची तारांबळ? इरफान पठाणने सांगितली नावं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ICC T20 World Cup 2026 आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे चाहत्यांसह माजी खेळाडूंमध्ये आता शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह खेळाडूंच्या दमदार प्रदर्शनाची मेजवानी चाहत्यांना अनुभवता येणार आहे. अशातच सर्वाधीक षटकार कोण मारणार? सर्वाधिक धावा कोण करणार? आणि सर्वाधिक विकेट कोण घेणार? या प्रश्नांचा सरबती होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच माजी खेळाडू इरफान पठाणने भाकीत वर्तवलं असून सर्वाधिक धावा करणारा, विकेट घेणारा आणि षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंची नावं त्याने सांगितली आहे.

इरफान पठाणने क्रिकइन्फोहिंदीशी बोलताना खेळाडूंची नावं सांगितली आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण असेल? असं विचारण्यात आल्यावर इरफानने सध्याच्या घडीचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्माचं नाव घेतलं. अभिषेक शर्मा दमदार फॉर्मात असून त्याच्या बॅटीमधून खोऱ्याने धावा निघत आहेत. त्यामुळे संघाकडूनही त्याला अशाच विस्फोटक फलंदाजीची अपेक्षा असणार आहे. तसेच सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू म्हणूनही इरफानने अभिषेक शर्माला पहिली पसंती दिली आहे. पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजांवर तुटून पडणारा अभिषेक शर्मा लांब लांब षटकार खेचण्यासाठी ओळखला जातो. तर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून त्याने वरुण चक्रवर्तीच्या नाव सांगितलं आहे. आयसीसी क्रमवारीचा विचार करता अभिषेक सर्मा 929 रेटिंग पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर गोलंदाजीमध्ये वरुण चक्रवर्ती 787 रेटिंग पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता इरफान पठाणसह हिंदुस्थानी चाहत्यांना या दोन्ही खेळाडूंकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असणार आहे.

सीट खाली आहे का? पाकिस्तानच्या भूमिकेवर कॉमेडी सुरूच; आइसलॅण्डपाठोपाठ युगांडाचेही कॉमेडी ट्विट