विकास दुबेच्या एन्काउन्टरवर तापसीची टीका, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

1600

उत्तर प्रदेशात 8 पोलिसांचा जीव घेणाऱ्या कुख्यात गँगस्टर विकास दुबे याचं शुक्रवारी सकाळी एन्काउंन्टर करण्यात आलं. या एन्काउन्टरवर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. या प्रश्नांच्या फैरीत अभिनेत्री तापसी पन्नू हिनेही उडी घेतली असून त्यामुळे नेटकऱ्यांच्या टीकेचा रोष तिने ओढवून घेतला आहे.

अनेक विषयांवर ठाम भूमिका घेण्यासाठी तापसी ओळखली जाते. अशाच प्रकारे तिने विकास दुबे याच्या एन्काउन्टरवर टीका केली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करून म्हटलं आहे की, वाह.. असं काहीतरी होईल असा आपण विचारसुद्धा केला नव्हता. कोण म्हणतं की आमच्या बॉलिवूडच्या चित्रपटांच्या कथा खोट्या असतात? अशी पोस्ट तापसीने केली आहे.

त्यावर नेटकऱ्यांनी तिला प्रत्युत्तर देत ट्रोल केलं आहे. जेव्हा 8 पोलीस कर्मचारी मारले गेले, तेव्हा काय झोपली होतीस का, असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तसंच, तुला इतका त्रास का होत आहे? जेव्हा त्याच्यामुळे आठ पोलीस शहीद झाले, तेव्हा का प्रश्न विचारले नाहीस, असं तिला विचारलं आहे. तर काहींनी तिच्यावर बहिष्कार घालण्याची मागणीही केली आहे. काहींनी यावर तिचं समर्थन केलं असून उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या