तहव्वूर राणाची कोठडी 6 जूनपर्यंत वाढवली

26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. राणाला तिहार जेलमध्ये अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर 24 तास नजर ठेवली जात असल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली. न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्याला कडक सुरक्षाव्यवस्थेत सायंकाळी तिहार तुरुंगात नेण्यात आले.राणाची न्यायालयीन कोठडीची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी एनआयएने त्याला न्यायमूर्ती चंदर जीत सिंग यांच्यासमोर हजर केले.